मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे. त्यावर ते ठाम आहेत. “आरक्षण मिळालं नाहीच तर आंदोलनासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचं नाही का?. मुंबईमध्ये जमावबंदी करायची असेल तर जिथे गर्दी होईल त्या सर्व ठिकाणी कारवाई करा” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.