मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडवण्यात येईल, असं विधान गृहमंत्री अमित शाह यांनी ५ राज्यांच्या निवडणुकी दरम्यान केलं होतं. यावरून शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. रविवारी (२४ डिसेंबर) मीरा भाईंदर येथील गोवर्धन पूजा समारोह सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.