सोलापूर हे खेडे असल्याच्या वक्तव्यावरून भाजपच्या दोन आमदारांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे आमदार सुभाष देशमुख आणि दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं दिसून आलं. “सोलापूर हे मोठे खेडं आहे. याचा आणखी विकास करून कसं मोठं करता येईल. याचा नावलौकिक कसा वाढवता येईल याचा विचार करायला हवा” असं विधान आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. यानंतर विजयकुमार देशमुख भाषणास उभे राहिले असता त्यांनी सुभाष देशमुखांच्या ‘खेडं’ या शब्दाला आक्षेप घेतला.