शिरूर लोकसभेसाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवारी आम्ही निवडूणच आणू, असे जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान देऊ केले आहे. “निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांनी (कोल्हे) राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना पदयात्रा सूचत आहे”, असा आरोप अजित पवार यांनी केला.