नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वचजण सज्ज झाले आहेत. मात्र नववर्षाचं स्वागत करताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबतही खबरदारी घेणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. घाबरण्याची स्थिती नाही पण काळजी घ्यायला हवी, असंही ते यावेळी म्हणाले.