राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना काल( २५ डिसेंबर) चॅलेंज दिलं होतं. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल, असा थेट इशारा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिला होता. यानंतर आज (२६ डिसेंबर) शिरुर लोकसभा मतदार संघात येणार्या मांजरी येथील उड्डाण पूल आणि अन्य विकास कामांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.