भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर यासाठी त्यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिद ज्या दिवशी पडली त्या दिवसाचा उल्लेख करत ते खास उदाहरण देत भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. तसंच भाजपाने जे पोस्टर तयार केलं आहे त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे.