पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणूक ही एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी रंगणार आहे. आता “एम.आय.एम.ला इंडिया आघाडीत सामील करून घ्या. महाराष्ट्रात माझा पक्ष काँग्रेस पक्षापेक्षा मोठा आहे. महाराष्ट्रात एम.आय.एम.चा एक खासदार आहे, काँग्रेसचा एकही खासदार नाही. भाजपाला हरवण्यासाठी पुन्हा प्रस्ताव देत आहोत, एम.आय.एम.ला इंडिया आघाडीत सामील करून घ्यावे”