पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आजपासून (२७ डिसेंबर) आक्रोश मोर्चा, शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरुवात झालीये. ३० डिसेंबरला हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं सांगितलं जातंय.