मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल? ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असं आज मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि ती सुरुच राहिल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला जे आरक्षण दिलं जाईल असं सांगितलं जातं आहे ते टिकणार आहे का? आम्ही ते नाकारलं नाही आम्हाला सगळं मान्य आहे. मात्र सरकारने सांगावं की ते टिकणार का? तसं होणार असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आहोत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.