२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यावरूनही राजकीय दावे-प्रतिदावे झाल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.