गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटची चर्चा पाहायला मिळत आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झालेली असताना केंद्र सरकारने काळजी करण्याचं कारण नसल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यांना दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमांना दिली. तसेच, यासंदर्भात सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचंही त्या म्हणाल्या.