आपल्या मराठी भाषेत, शासनाचं काम आणि दहा वर्ष थांब! अशी एक प्रचलित म्हण आहे. मुंबई गोवा महामार्ग या म्हणीचं मुर्तीमंत उदाहरण आहे. या महामार्गाचं काम ५ नाही १० नाही तर तब्बल.. १३ वर्ष लोटली तरी पूर्ण होऊ शकलेलं नाही. २०२३च्या डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र महामार्गाच्या प्रतिक्षेत आणखिन एक वर्ष सरलं, असे म्हणण्याची वेळ कोकणवासींयावार आलीये. जाणून घ्या महामार्गाच्या रखडण्याची कहाणी!