काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त आज ( २८ डिसेंबर ) नागपुरात ‘हैं तयार हम’ ही महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्याला राहुल गांधी यांनी संबोधित करताना भाजपाच्या लोकसभेतील एका खासदाराचा किस्सा सांगितला. भाजपाच्या खासदाराने भेटून काय तक्रार केली याबद्दल राहुल गांधी बोलले आहेत.