अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रणावरून राजकारण सुरूये. या सोहळ्यासाठी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. “आम्ही आमंत्रणाची वाट बघत बसलो नाही. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा हा भारतीय जनता पक्षाचा हा कार्यक्रम आहे. २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टच्या परेडचा हा कार्यक्रम नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवू द्या. अशा कार्यक्रमाने प्रभू राम यांना त्रास होईल आणि ते पुन्हा वनवासातं जातील असे कृत्य करू नका” अशी टीका राऊतांनी केलीये.