Thane Rave Party: ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सापळा रचत उधळली रेव्ह पार्टी
नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे उत्साह दिसत असताना ठाण्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. घोडबंदर परिसरातील गायमूख येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. ठाणे गुन्हे शाखेने या पार्टीवर धाड टाकून ९५ तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यात पाच महिलांचा समावेश आहे. ही पार्टी कोणी व कशी आयोजित केली होती. याबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.