अयोध्येत तयार होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे. प्रभू राम लल्ला २२ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. त्याआधी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राम कोणत्याही पक्षाचा नाही, राम आदर्श पुरुष आहे. निमंत्रणावरून वाद झाला पण कुणाला बोलवायचे हा त्याचा प्रश्न आहे. सगळ्यांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिली आहे, कोणत्या एका पक्षाने देणगी दिली नाही. रामनवमीच्या दिवशी राम मूर्ती प्रतिष्ठापणा झालीं असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे” असं पाटील म्हणाले