केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला आहे. या कायद्यानुसार अपघातास जबाबदार वाहन चालकास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. या कायद्याविरोधात महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच वाहन चालक आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईतील शेकडो वाहन चालकांनी रस्त्यावर उतरुन रस्ता रोको केलं. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून पोलिसांनाही काठ्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.