‘प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज (४ जानेवारी) पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तिरडी आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.