महानंदाच्या कर्मचाऱ्यांना गेले पाच महिने पगार नाही, सरकारला एवढी भीक लागली आहे का? असा थेट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. महानंदाच्या २७ एकर जमिनिवर गुजरात लॅाबीचा डोळा असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.