Javed Akhtar on Animal Movie: “जर हे चित्रपट हिट होत असतील…”, गीतकार जावेद अख्तर यांचे वक्तव्य
‘अॅनिमल’ या संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचप्रमाणे हा सिनेमा चर्चेचाही विषय ठरला. अनेकांना हा सिनेमा आवडला तर अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली. त्यावेळी तमाशाने समाज बिघडत नाही आणि किर्तनाने सुधरत नाही अशा म्हणींचा वापर करुन एकमेकांना उपदेशाचे डोसही पाजले गेले. या सगळ्यावर लेखक, कवी जावेद अख्तर यांनी परखड भाष्य केलं आहे. ‘अॅनिमल’ सारखे चित्रपट हिट होणं ही चिंतेची बाब आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.