मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे, अशी प्रतिक्रिया शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी दिली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी मोहोळ कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर स्वाती मोहोळ यांनी माध्यमांसमोर प्रतिकिया दिली. सरकार आणि प्रशासनावर आपला विश्वास असल्याचं त्यांनी व्यक्त केलं.