शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. अवघ्या दोन दिवसांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय समोर येणार आहे. जसजशी ही तारीख जवळ येऊ लागली आहे तसतशी शिवसेनेच्या आमदारांची धाकधुक वाढू लागली आहे. यावर स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अध्यक्षांकडे जी सुनावणी झाली आहे, त्याचा निकाल उद्या हाती येईल. आत्ताच्या घडीला विधानसभेत आणि लोकसभेतील बहुमत आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत पक्ष आणि चिन्ह दिले आहे, त्यामुळे आमच्या बाजूने निकाल लागेल” असं शिंदे म्हणालेत.