Maharashtra ED Raid: ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी व कार्यालयांवर मंगळवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. जोगेश्वरी जमीन घोटाळा प्रकरणात ही धाड टाकल्याचं सांगितलं जात आहे. या धाडीनंतर विरोधकांकडून आकसापोटी कारवाई करण्यात आल्याची तक्रार केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला?’ असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरच हल्लाबोल केला आहे.
The ED raided the house and offices of Thackeray group MLA Ravindra Waikar on Tuesday morning. It is said that this raid was made in the Jogeshwari land scam case. Chief Minister Eknath Shinde has taken note of the opposition’s criticism while complaints are being made that action has been taken by the opposition after this raid. The Chief Minister has attacked the opposition by asking, ‘Why is he afraid of tax?’