शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. अवघ्या दोन दिवसांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय समोर येणार आहे. याबाबत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्ष हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कसे काय जातात? असा प्रश्न उपस्थित होतो. यांची मिलिभगत आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण होतो”