राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे, असं विधान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. आपल्या या विधानावर ते कायम आहेत. मंगळवारी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय भूंकपाच्या विधानाचा पुनरुच्चार केला. मोठे नेते भाजपात येतील, असं सूचक विधानही त्यांनी केलं.