शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय आज घेतला जाणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकालाचं वाचन करणार आहेत. हा निकाल नेमका काय असणार आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत मॅच फिक्सिंग झालं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंनी उलटसुलट निर्णय घेतला गेला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जायची तयारी ठेवली आहे असंही म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. आम्ही घटनाबाह्य सरकार नाही ठाकरे गट घटनाबाह्य आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच राहुल नार्वेकर मेरिटवर निर्णय घेतील अशी आशा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.