शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष या निकालाकडे होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीन महिन्यांच्या सुनावणीनंतर हा निकाल दिला. निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागला असून मूळ शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या निकालातील विरोधाभासावर बोट ठेवत केलेलं परखड विश्लेषण.