आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काल (१० जानेवारी) शिंदेंच्या बाजूने लागले. शिवसेना पक्ष शिंदेंचाच असल्याचं निकालात नमूद करण्यात आलं आहे. तर ठाकरे आणि शिंदे गटातील दोन्ही आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून न्यायालयात जाण्याबाबत भाष्य केलं आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे.