शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले दिसत आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही, असं ते म्हणाले. तसंच आम्हाला उत्तम संधी प्राप्त झाली आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.