मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आमदार अपात्रतेच्या निकालाचं स्वागत करत असताना उबाठा गटावर टीका केली होती. “या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे”, असे शिंदे म्हणाले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित करत प्रत्युत्तर दिले.