विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर “सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायाधिकरणाची (tribunal) जबाबदारी दिली होती. मात्र वकील असलेल्या राहुल नार्वेकर यांनी न्यायाची बाजू न मांडता शिंदे गटाची वकिली करण्याचे काम काल केले” अशी टीका संजय राऊतांनी केली होती, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.