अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आलेलं नसून तिथून पुढे असलेल्या चार किमी अंतरावर बांधण्यात आलं आहे, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.