एकीकडे राज्यात सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील फुटीच्या सुनावणीची व निकालाची चर्चा असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटिल होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे म्हणाले की, “पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा आकडा एक करोड होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ” असं जरांगे म्हणालेत.