अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त अनेकज प्रभू श्री राम यांच्याप्रती असेलेली आपली भक्ती विविध माध्यमातून व्यक्त करत आहेत. जम्मू काश्मीरमधील बटूल झेहरा या तरुणीने चक्क पहाडी भाषेत राम भजन गायलं आहे. तिने गायलेलं हे भजन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. याबाबत बटूल झेहराने आपली प्रतिक्रया दिली आहे.