आमदार अपात्रतेच्या निकालाप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेतली. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचे सर्व विश्लेषण या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. त्याचप्रमाणे कायदेशीर बाजूही समजावून सांगण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केलेले पुरावे जनतेसमोर मांडले. त्याचे थेट व्हिडीओही दाखवले.