विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. या निकालानुसार शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदार पात्र ठरले आहेत. या निकालाविरोधात काल मंगळवारी (१६ जानेवारी) वरळी येथे ठाकरे गटाने महापत्रकार परिषद बोलावली. यावेळी आमदार अनिल परब यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केलेले पुरावे जनतेसमोर मांडले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलंय.