विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. या निकालानुसार शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदार पात्र ठरले आहेत. या निकालाविरोधात काल मंगळवारी (१६ जानेवारी) वरळी येथे ठाकरे गटाने महापत्रकार परिषद बोलावली. यानंतर संजय राऊत आणि राहुल नार्वेकर यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.