शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीमधील आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरुवारी (१८ जानेवारी) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. अनेक तास त्यांच्या घरात धाडसत्र सुरू होतं. साळवी यांच्या मालमत्तांचा शोधही घेण्यात आला. त्यानंतर राजन साळवी यांच्याकडे साडे तीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सांगून एसीबीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नऊ तासांच्या चौकशीनंतर राजन साळवींनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.