एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी-चिंचवडची पूजा वंजारी ही अव्वल आली आहे. संसार आणि अभ्यास अशी कसरत करून तिने हे यश संपादन केल्यानं तिचं विशेष कौतुक होत आहे. या संपूर्ण प्रवासात तिचं कुटुंब तिच्या पाठिशी राहिलं. यावेळी पूजाने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.