अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची लगबग सुरू असून २२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. एकीकडे या सोहळ्याची देशभर चर्चा होत असताना दुसरीकडे चर्चा आहे ती कोल्हापूरच्या निवास पाटील यांची. ६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत बाबरी ढाचा पाडला, तेव्हा त्या आंदोलनात निवास पाटील सक्रिय होते. यावेळी त्यांनी मंदिर बनवलं जात नाही, तोपर्यंत अनवाणी आयुष्य जगण्याचा निर्धार केला आणि तो पूर्णही केला.