आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी (५ जानेवारी) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी सुरू केली असून कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.