पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना पत्रकारांना लांब ठेवलं जात होतं. गेल्या आठवड्यामध्ये पिंपरीत झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयकुमार चौबे यांना सांगूनदेखील त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकारांना नेत्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवलं जात आहे? अशी विचारणा केली. यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले.