येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. याच दिवशी राम मंदिरातील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोथरूड भागातील श्रीराम मंदिरात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतले.