बहुप्रतिक्षित भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने अयोध्या नगरीसह देशभरातील अनेक महत्त्वाची शहरे, ग्रामीण भाग सजले आहेत. ठिकठिकाणी दिवाळीचा जल्लोष सुरू झाला आहे. निमंत्रित अयोध्येत दाखल होत असून अयोध्येमध्ये तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे.