राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला आज सकाळी एक्स अकाऊंटवर कार सेवेसाठी नागपूर रेल्वे स्थानकावरून अयोध्येला जातानाचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोनंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली. “तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? आपण सगळे नागपूर स्टेशनला फिरण्यासाठी गेला असाल. पण, आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरीच्या घुमटावरील फोटो आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. तसेच हा फोटो त्यांनी आज सोशल मीडियावर शेअर का केला? याचेही उत्तर दिले.