भगवान श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. ५०० वर्षांपासून या दिवसाची प्रतिक्षा होती. अखेर भगवान श्रीरामाची मूर्ती राम मंदिरात विराजमान झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, “”मी प्रभू श्रीरामांची माफी मागतो. आमच्याकडून तपस्येत कमतरता राहिली असावी; कारण आपण इतक्या वर्षात हे काम करु शकतो नाही. आज ते पुर्ण झाले. मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्याला नक्की क्षमा करतील”