प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापनेची विधी संपन्न झाली. गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येत या भव्य सोहळ्याची तयारी सुरू होती. अखेर आज मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा पार पडला.