पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २२ जानेवारीला अयोध्येतील बहुचर्चित रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडण्याआधी पंतप्रधांनानी आपण ११ दिवसांचे धार्मिक अनुष्ठान स्वीकारणार असल्याचे सांगितले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हातून प्रभू रामाच्या चरणामृत प्राशन करून आपला उपवास सोडला. यावेळी गोविंदगिरी महाराजांनी मोदींचे कौतुक करत त्यांनी हे अनुष्ठान कसे पाळले याविषयी भाष्य केले.