राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटाकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून मोदी सरकार व भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना रावणाची उपमा देताना उद्धव ठाकरेंना रामाची उपमा दिली. प्रभू श्रीरामाप्रमाणेच उद्धव ठाकरेंना संकटांचा सामना करावा लागत असल्याचं यावेळी ते म्हणाले.